Ad will apear here
Next
काशिनाथ भतगुणकी यांना वसुंधरा मित्र पुरस्कार

सोलापूर : वृक्षारोपणाच्या चळवळीतील कार्यकर्ते काशिनाथ भतगुणकी यांना नुकताच वसुंधरा मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपट दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. 

किर्लोस्कर समूहातर्फे सोलापुरात नुकताच वसुंधरा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या महोत्सवात दुसऱ्या दिवशी भतगुणकी यांचा गौरव करण्यात आला. या वेळी उपवनसंरक्षक एस. एन. माळी, पर्यावरणप्रेमी बाबूराव पेढकर, वीरेंद्र चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते. 

काशिनाथ भतगुणकी हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग येथील रहिवासी आहेत. त्यांनी आपले गाव पूर्णतः प्लास्टिकमुक्त केले आहे. त्यासाठी त्यांनी ग्रीन आर्मीची स्थापना केली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना रोप, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी चित्राव यांनी संदीप सावंत आणि नीरजा पटवर्धन यांच्याशी संवाद साधला. तसेच माळी यांनी आपले विचार व्यक्त केले. या समारंभाला पर्यावरणप्रेमी नागरिकांनी गर्दी केली होती. हृषीकेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZETBF
Similar Posts
इको क्विझ व पथनाट्य स्पर्धा पुणे : ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’अंतर्गत घेण्यात आलेल्या इको क्विझ आणि पथनाट्य स्पर्धेचे निकाल बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या सांगता समारंभात जाहीर करण्यात आले. इको क्विझ स्पर्धेत फर्ग्युसन महाविद्यालय, तर पथनाट्य स्पर्धेत एच. व्ही. देसाई महाविद्यालय विजेते ठरले. सांगता समारंभाचे अध्यक्ष आर
एम. के. रणजित सिंह यांना वसुंधरा सन्मान पुणे : १२व्या ‘किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवा’चे उद्घाटन सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस. नल्लामुथ्थु यांच्या हस्ते चार जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. या समारंभात अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते ‘किर्लोस्कर वसुंधरा मित्र’ पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. ‘वसुंधरा सन्मान’ वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या एम
पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी सर्वांची पुणे : ‘पर्यावरण संवर्धन करताना काही विशिष्ट घटकांकडेच लक्ष दिलं जातं, आपण वाघाच्या संवर्धनाबाबत गंभीर असतो, पण त्याच वेळेला माळढोक, रानम्हशी यासह जंगल आणि सागरामधील अनेक वनस्पती, जीव नष्ट होत आहेत याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. निसर्गातील सर्व घटकांचं संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं,’ असे
सोलापुरात करिअर मार्गदर्शन मेळावा सोलापूर : बारावीचे निकाल नुकतेच लागले असून, दहावीचेही निकाल लवकरच लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या मुलांनी पुढे काय करायचे याबाबत पालकांच्या मनात, तसेच या मुलांच्याही मनात अनेक शंका असतात. ही बाब लक्षात घेऊन सोलापुरातील ड्रीम फाउंडेशनने करिअर मार्गदर्शनाचा शहरातील सर्वांत मोठा मेळावा नऊ जून ते १६ जून या कालावधीत आयोजित केला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language